आज दि १३ स्पटेंबर रोजी दुपारी तीन वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथील सचिन चव्हाण व देवचंद राठोड या दोन तरुणांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कन्नड ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे. पिशोर नाका येथून त्यांनी पायी प्रवासास सुरुवात केली. सुमारे ३७० किलोमीटर अंतर पार करून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत.त्यांच्या या पद यात्रेला समाज बांधवांचा पाठींबा मिळाला असून या पदयात्रेकडे समाजाचे लक्ष लागले आहे.