आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेल्या कारंजा येथील अयान खानचा दिनांक 25 ऑगस्ट रोजी ब्रिटनमधील एडिनबर्ग शहराजवळील हारलौ जलाशयात बुडून मृत्यू झाला होता.स्कॉटलंडमधील गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अयानचे नातेवाईक जावेद खान, अरशान खान, रोमान खान यांनी स्कॉटलंड पोलिस अधिकारी जेनिफर, भारतीय दूतावासाचे अधिकारी नेगी व हेरियट विद्यापीठाचे डायरेक्टर पॉवेरी कॅम्पबेल यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. प्रयत्नांनंतर प्रक्रिया पूर्ण झाली.