धरणगाव येथील सोनवद रस्त्यावरील अमरधाममध्ये वाढलेल्या गवतामुळे आणि घाणीमुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, धरणगाव नगरपालिकेने शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता स्वच्छता मोहीम राबवली. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या आदेशानुसार, ही मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे घाणीचे साम्राज्य पूर्णपणे हटले आणि परिसराला स्वच्छ स्वरूप प्राप्त झाले.