यवतमाळ येथील पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी भक्तिभावाने विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज पारंपरिक पद्धतीने “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात विसर्जन करण्यात आले. आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप देताना मनात पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना करण्यात आली.