बुलढाणा नगर परिषदेच्या मालकीच्या इमारती,भुखंड,शाळा, व्यायामशाळा,व्यापारी गाळे तसेच इतर नगर परिषदेच्या करोडो रूपयांच्या वास्तु ह्या वेगवेगळ्या राजकीय तथा संस्थांना दिलेल्या आहेत.नगर परिषद कायद्यांतर्गत ह्या जागा 3 वर्षाच्या वरती देता येत नाही.सदर जागा कुठल्या प्रकारचा ठराव न घेता मुख्याधिकारी यांनी राजकीय नेते व संस्थेला दिल्याचा आरोप काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकस यांनी आज दुपारी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलं आहे.