नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात दुपारी चार वाजेपासून बस स्थानक परिसरात एका माथेफिरू ने मोठी दहशत निर्माण केली होती. बस स्थानक परिसरात उभे असलेली एक मोटर सायकल जाळली असून पोलीस गाडीवर दगडफेक त्याने केली. परिसरात नागरिकांच्या मनात या प्रकारामुळे भीती निर्माण झाली होती. या भयानक प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.