घराच्या बांधकामासाठी माहेरून तीस हजार रुपये आणा, अशी मागणी करून पती, सासू, सासरा आणि दिराकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आशा किशोर गायकवाड नायगाव खुर्द तालुका चिखली या विवाहितेने पेनटाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.