कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अंमल सुरेश मुकाडे ह.मू मोरवाडी ता.कळमनुरी हा युवक दि .8 सप्टेंबर रोजी सकाळी मिस्त्री काम करण्याकरता बाहेरगावी गेला होता रात्री उशिरा परत आपल्या गावी येत असताना त्यांच्या मोटरसायकलला निलगायीने जोराची धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली असता तात्काळ आ .संतोष बांगर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.त्यास हिंगोली येथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नांदेड आणि त्यानंतर संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले .