हतनूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्पात 231.19 दशलक्ष घनमीटर अर्थात 8.16 टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. आवक लक्षात घेता प्रकल्पाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडून सांडव्यावरून 95 हजार 32 तर उजव्या कालव्यातून 300 क्यूसेक असा 95 हजार 332 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान धरणाचे १६ दरवाजी पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असल्याची माहिती, हतनूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दिली.