बुलढाणा शहरातील देवकर पेट्रोल पंप येथे 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान साप आढळून आला साप दिसताच सर्पमित्र एस.बी रसाळ यांना माहिती दिली असता सर्पमित्र एस.बी रसाळ यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अति विषारी घोणस प्रजातीच्या सापाला पकडून भरणी बंद केले. सापाला पकडून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल प्रदीप डांगे सह देवकर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र एस.बी रसाळ यांचे आभार व्यक्त केली.