नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून प्राप्त माहितीनुसार, अक्कलकुवा शहरातील शिवनेरी चौकातील रहिवासी सुरज परदेशी यांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीच्या उद्देशाने आपल्या घरात साठवणूक करून ठेवला होता. लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत या प्रकरणी अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.