तालुक्यातील चमक खुर्द येथे किरकोळ वादातून वृद्धासह त्याच्या मुलावर लाकडी कुबडीने हल्ला झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी समरसपुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी पंढरी भययाजी अडलक (६५) हे आपल्या मुलगा रोषणसोबत घराबाहेर उभे असताना आरोपी सुखराम ईवने (रा. चमक खुर्द) तेथे आला. “तुम्ही जोरजोरात का ओरडता” असा सवाल करत त्याने वाद घातला. यावेळी फिर्यादींच्या हातातील लाकडी कुबडी हिसकावून घेत आरोपीने त्यांच्या डोक्यावर व हातावर प्रहार केला. यानंतर आर