शहर पोलिस गस्तीवर असताना त्यांना गौशाल वॉर्डातील न्यू फ्रेंडस गणेश उत्सव मंडळ पंडाल परिसरात तरुण पिवळ्या रंगाचे कव्हर हातात घेऊन पंडालखाली काहीतरी लपवताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो फरार झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) पहाटे २:२५ वाजता घडली. पोलिसांनी कव्हर उघडून पाहिले असता त्यात लोखंडी तलवार सापडली. तलवार पिवळ्या धातूची मूठ असलेली, धारदार टोकाची असून तिची लांबी सुमारे ५४ सें.मी. आहे. किंमत अंदाजे ५०० रुपये आहे. ही तलवा