जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात एका तरुणाच्या बंद घरातून चोरट्याने ५६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विवेक किशोर चव्हाण (वय ३४, रा. म्हसावद) यांच्या घरात ही चोरी झाली असून, २० ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.