कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून जनावरांच्या सोयीसाठी कोंडवाडा सुरू आहे. मात्र या ठिकाणी जनावरांच्या दृष्टीने पाणी व चाऱ्याची सोय नसल्याने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता येथील जनावरांना चारा पाणी देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.