पोलीस ठाणे सीताबर्डी अंतर्गत येणाऱ्या ग्लोकल मॉलमधील एका दुकानातील कर्मचाऱ्यांचा मोबाईल एका व्यक्तीने हातचालाखीने चोरून नेला. ही संपूर्ण घटना 5 सप्टेंबर ची असून सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल होत असून आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण पाहू शकता की कशाप्रकारे आरोपी तोंडाला रुमाल बांधून दुकानात शिरला.