मराठा समाजाच्या तरूण पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वाधिक निधी, योजना, कामे ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झाली असताना मराठा समाजातील तरुणांची माथी भडकावून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे हीन दर्जाचे राजकारण सध्या विरोधकांकडून केले जात असल्याची घणाघाती टीका आज सोमवारी सकाळी १० च्या सुमारास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी केली.