आगस्ट 2025 गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील दुर्गम कोपर्शी जंगल परिसरात काल, 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासून सुरु झालेल्या मोहिमेत पोलिस दल आणि माओवादी यांच्यात जवळपास आठ तास भीषण चकमक झाली. या चकमकीत एकूण चार जहाल माओवादी ठार झाले असून, त्यात एक पुरुष आणि तीन महिला माओवादींचा समावेश आहे. या कारवाईनंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी अत्याधुनिक शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.