नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा थंड हवेच्या तोरणमाळ या पर्यटन स्थळी जाणारा तोरणमाळ घाटातील सात पायरी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे सकाळच्या वेळेस दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तोरणमाळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे.