पोलीस असल्याची बतावणी करुन पोलीस ठाण्यात चल, असे म्हणून कारमधून कामगाराचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन लुबाडणाऱ्या या बंटी, बबलीला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. श्रीकांत डोईफोडे आणि शितल पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार, ३ मोबाईल असा २ लाख ९५ हजार रुपयांचा माल जप्त केला