राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. पूनम गेट येथे काढण्यात आलेल्या या लक्षवेधी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाने आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी केली. आरोग्य सेवेतील अस्थायी पदांना स्थायी दर्जा द्यावा, असे विविध मागण्या केल्या.