आगामी गणेशोत्सव आणि इतर धार्मिक उत्सवात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणून शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून नागरिकांनी Miss Call' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन वीरशैव व्हिजनचे संस्थापक- अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. बुरकुले म्हणाले की, "सोलापूर शहरात प्रत्येक सण साजरा करताना उत्साहाबरोबरच ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर वाढते."