कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह आज ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सर्व सदस्यांनी येरवडा कारागृहास भेट दिली. यावेळी कारागृहातील सुरक्षा, सुविधा, परिस्थिती, क्षमता, कैद्यांची संख्या, त्यांना मिळणारे जेवण, आरोग्य व्यवस्था या सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कारागृह प्रशासन पूर्णपणे जेल मॅन्युअलनुसार चालते का, याचीही समितीने पाहणी केली व माहिती घेतली.