आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास भिवंडी येथील सिराज रुग्णालयाजवळ एक भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव डॉ. नसीम असून डॉ. नसीम हे स्कूटर वरून आपल्या घरच्या दिशेने जात होते. अचानक डॉ. नसीम यांचा तोल गेला आणि ते एका ट्रेलर खाली आले. ट्रेलर खाली चिरडल्या गेल्याने नसीम यांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेकदा असे अपघात होत असतात असं स्थानिकांच सांगणं आहे.