राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची दिनांक पुढे पंधरा दिवसांनी वाढ करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय लोककलावंत,दिव्यांग, निराधार, संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पोर्टल कार्यरत नसल्यामुळे अनेकांना तांत्रिक अडचणी येत आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस सुद्धा सुरू असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा वीजपुरवठा सुद्धा खंडित होता.