पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 28 ऑगस्ट ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार, काजू कंपनीत कंपनीतले कर्मचारी चोरी करत असल्याची तक्रार पारडी पोलिसांना प्राप्त झाली होती याप्रकरणी पोलिसांनी तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.