राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' असे मानणारे आ. श्री. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे