जय भवानी रोड परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अनुषंगाने अनेक वेळा वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली असता वन विभागाने तात्काळ दखल घेत दोन पिंजरे आर्टलरी सेंटरच्या आत मध्ये व दोन पिंजरे बाहेर असे चार पिंजरे लावून बिबट्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.