Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दि २७ ऑगस्ट रोजी सांयकाळी सात वाजता माध्यमांना माहिती मिळाली की बाजारसावंगी येथे राहत्या घरात युरियाचा अनधिकृत साठा करून शेतकऱ्यांना चढ्या दराने विक्री करणाऱ्या रोहित कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. शेषराव कारभारी काटकर यांच्या दुकानात साठवलेला युरिया ३५० ते ४५० रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला