गणेशोत्सवादरम्यान शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला वाघोली पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.विलेश धारासिंग पावरा (वय २२, रा. महादेव दोंदवाडा, ता.शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.