Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्जुनी मोरगाव: बोंडगाव/सुरबन येथे वडीलाचा खून करणाऱ्या मुलाविरोधात पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा दाखल

Arjuni Morgaon, Gondia | Sep 11, 2025
मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा मुलाने काठीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी ७:४० वाजता दरम्यान केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडगाव-सुरबन येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मृताचे नाव विलास दयाराम मानकर (४७, रा. बोंडगाव-सुरबन) असे आहे. याप्रकरणी वडील विलास मानकर यांचा खून करणारा मुलगा संतोष मानकर याच्या विरोधात पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us