जुन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या जीसीसी-टिबीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील प्रेरणा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये इंग्रजी ३० विषयात संकेत राजकुमार खडसे याने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. इंग्रजी ४० विषयात स्वाती उमेश लखवाडे हिने ८५ टक्के गुण प्राप्त केले, तर मराठी ३० विषयात आंचल रमेशराव पाटील हिने ८५ टक्के गुण प्राप्त केले. अशी माहिती ता.26 मंगळवारला दुपारी 4 वाजता प्राचार्य प्रफुल्ल नरानिया यांनी दिली.