सिंधी बाजार दुर्घटना प्रकरणी आयुक्तावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा;वंचित बहुजन आघाडीची मागणी.. अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार न पाडता, राजकीय दबावाखाली आदेश झुगारले.. जालना : शहरातील सिंधी बाजार येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू तर चौदा वर्षीय बालिका मृत्यूशी झुंज देत असताना, या संपूर्ण घटनेला महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.