हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी येथील शाळेत आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी अकरा वाजता दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शाळेच्या प्रांगणात व शाळेत पाणी घुसले आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना आज शाळेमध्ये शिक्षणासाठी येता आले नाही व आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर देखील जाता येत नसल्याचं चित्र समोर आले आहे.