कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत. कोपरगाव मतदार संघातील पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावांना फटका बसला आहे.