खुलताबाद तालुक्यातील मौजे सराई येथील बौद्ध समाज सन २०११ पासून समाज मंदिरात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम साजरे करत आहे.०२ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह एक दिवसाची परवानगी द्यावी असे निवेदन बौद्ध समाजाने दि. २९ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना दिले आहे.प्रकरण अद्याप चालू असून निर्णय झालेला नाही; त्यामुळे कार्यक्रमास अनुमती देण्याची मागणी करण्यात आली आहे.