नागपूरहून कोलकाता कडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटातच 272 प्रवाशांना सुखरूप नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. उडान्नानंतर काही वेळातच पक्षाची विमानाला धडक बसली यामुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला. हे विमान कोलकात्याला जाणार होते परंतु वैमानिकाने हवेत न्यूटन घेण्याचा निर्णय घेतल्याने नागपुर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. या विमानाने आज 2 सप्टेंबरला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी उडान घेतली होती. आकाशात झेप घेतात एका पक्षाने धडक दिली.