आज बिहार मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात वोट अधिकारी यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत विरोधी पक्षाचे नेते मोठ्या संख्येने सामील झाले होते. मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील या यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आज दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.