आज एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला आहे. यादरम्यान वोट चोर गद्दी छोड यासारखे नारे देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. यामध्ये संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर काळी शाही फेकण्याचा विरोध देखील करण्यात आला.