माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि ३१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सांगितले की, मनोज जरांगे यांनी संघटक शक्ती म्हणजे काय हे दाखवून दिले आहे.त्यांच्या मते, संघटक शक्ती टिकली तर कुणालाही झुकावे लागते, नाहीतर काहीही साध्य होत नाही.मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ते मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चात सहभागी होणार आहेत.जाधव म्हणाले, "जिथे जरांगे थकतील, तिथून मी लढा पुढे नेईन आणि मराठा समाजासाठी न्याय मिळवूनच देईन."