कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास ३० लाखांची खंडणी लुटल्याचा दावा श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला आठ जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाजार समिती सदस्य अजय लोहकडे यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे केली आहे.