महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते. ऊस, कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा, धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे महायुतीने जनतेला आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यावर मात्र या गंभीर विषयांबाबत महायुती करत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी केला आहे.सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली