नागनाथ नन्नवरे या इसमावर दहा-बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून अपहरण केल्याची घटना बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे घडली. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेतील आरोपींना भूम तालुक्यातील आंबी येथून शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता, ताब्यात घेण्यात आले आहे.नन्नवरे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून आरोपींचा शोध घ