कळंब तालुक्यातील मोहा येथे गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमेश मक्कल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात तब्बल १२० जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जाळपोळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कळम पोलिसांच्या वतीने २८ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.