चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे- राजवाडी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटनासमोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगला मनोहर वाघे वय १५ आणि सुप्रिया यशवंत वाघे वय १४ अशी या मृत मुलींची नावे आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्या स्पष्ट झाले नसले तरी विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.