कौटुंबिक वादातून विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू नेल्या. तसेच, पतीचे कपडे जाळल्याप्रकरणी पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी रेणुका कांबळे ऊर्फ रेणुका सिद्धाप्पा सन्नाके, जनाबाई सिद्धप्पा सन्नाके, सुरेश सिद्धप्पा सन्नाके, आकाश सिद्धप्पा सन्नाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.