नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील उमर्दे बुद्रुक गावात घराजवळ शौचालय बांधकाम वरून भावंडांमध्ये मारहाण प्रकरण घडले होते. याप्रकरणी 1 सप्टेंबर रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्यात मेहरचंद जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गोरख जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.