रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट मित्रपरिवार रामटेक तर्फे जागतिक फार्मसीस्ट दिवसाचे औचित्य साधत गुरुवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता पर्यंत किंमतकर हॉस्पिटल,गांधी चौक रामटेक येथे भव्य रक्तदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रियेश महाजन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यात 23 इसीजी, 29 व्यक्तींनी रक्तदान व 42 लोकांनी आरोग्य चाचण्या केल्या तर 50 लोकांनी अवयव दानाचे नामांकन केले.