मागील काही वर्षांपूर्वी विवाह संपन्न झालेल्या पती-पत्नीचा घरगुती भांडणावरून वाद सुरू आहे. त्यामुळे पती-पत्नी विभक्त राहत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास पत्नी तिच्या वडिलांसोबत येत असतांना पतीने तिला आवाज दिला. पतीने आवाज दिल्याने पत्नी एका घरामागे थांबली. त्यावेळी पतीने तिथे जात पत्नीला लोखंडी रॉडणे मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गराडा येथे घडली.