आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आले आहेत. शहरातील बाबा रिसॉर्ट सभागृहात माध्यमांशी माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार हे दोन-तीन समाजात भेदभाव न करता सर्व समाजांसाठी काम करीत आहे. प्रत्येकाला न्याय देण्याचे भूमिका राज्य सरकारची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.